Pedestrians' deaths in Pune

Pedestrians’ fatalities have suddenly jumped in Pune in the last 4 years.  Nearly twice as many pedestrians died in Pune in 2023 as compared to 2019.

120 deaths!  How would you react if two buses crashed in Pune every year, killing all on board?

पुण्यातले पादचारी मृत्यू गेल्या ४ वर्षांमध्ये खूपच वाढले आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये जवळपास दुप्पट पादचारी मृत्युमुखी पडले आहेत!

१२० मृत्यू! पुण्यात दरवर्षी २ बसेस कोसळून त्यातले सगळे प्रवासी ठार झाले असते तर आपली प्रतिक्रिया काय असती?

pune-accidents-2016-23-ped

But vehicles don't stop even if you raise your arm...

The technique explained in the video above is not intended to stop oncoming vehicles, but simply to make yourself visible to the drivers.

This technique is not a ‘phoren’ concept.  In 2010, the SP of Angamali, a town in Kerala, habituated people to raise their arm while crossing the roads, and that reduced pedestrians’ fatalities by 50%!

वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तंत्र वाहने थांबवण्यासाठी नसून, त्या वाहनचालकांना आपण लवकर दिसावे म्हणून उपयुक्त आहे.

हे तंत्र परदेशातून आयात केलेले नाही. २०१० साली केरळमधल्या आंगमली शहरामधल्या पोलीस अधीक्षकांनी रस्ता ओलांडताना हात समोर धरायची सवय लोकांना लावली, आणि तिथले पादचारी मृत्यू ५०% ने कमी झाले!

What else should pedestrians do?

Raising your arm provides you with an effective additional tool to make yourself safer, but you must take all necessary precautions, including the following:

  • Do not run while crossing the road
  • Be aware that a vehicle overtaking a truck/bus may not be able to see you even if you raise your arm
  • Be extra careful if crossing near a turn
  • Watch out for vehicles from an approaching lane
  • When reaching the other end of the road, look on both sides again as there could be wrong-side vehicles coming from your right.
  • Do not start crossing the road if the pedestrian signal has started blinking red.
  • If you could cross only half the road and have to stand & wait on the road divider / pedestrians’ refuge, face the traffic and be alert.  Do not use your phone there.
  • In general, do not use your phone till you cross the entire width of the road.

रस्ता ओलांडताना हात समोर, वर धरल्याने तुम्ही अधिक सुरक्षित राहता, पण तरीही खाली दिल्याप्रमाणे इतर सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यकच आहे.

  • कधीही पळतपळत रस्ता ओलांडू नका.
  • तुम्ही हात समोर धरलेला असला, तरीही एखाद्या ट्रक/बसला ओव्हरटेक करणार्‍या वाहनाला कदाचित तुम्ही दिसू शकणार नाही हे लक्षात घ्या.
  • वळणाजवळ रस्ता ओलांडताना अधिकच सावध राहा.
  • बाजूच्या गल्लीमधून येणार्‍या वाहनांकडेही लक्ष द्या.
  • रस्ता ओलांडून होत असताना पुन्हा दोन्हीकडे पाहा. कदाचित रस्त्याच्या उलट दिशेने येणारी वाहने तुमच्या उजवीकडून येत असतील.
  • पादचारी सिग्नलचा लाल दिवा उघड-मिट करत असेल तर रस्ता ओलांडायला सुरुवात करू नका.
  • तुम्ही अर्धा रस्ता ओलांडून दुभाजकावर / पादचारी चौथर्‍यावर उभे असाल तर रहदारीकडे तोंड करून सावध राहा. फोन वापरू नका.
  • एकंदरच, संपूर्ण रस्ता ओलांडून होईपर्यंत फोनचा वापर करू नका.

Safety while walking along a road

While walking along a road, use the footpath as much as possible. If you are compelled to walk on the road, walk on right so that you face approaching vehicles.

रस्त्याच्या कडेने चालताना शक्य तेवढा पदपथाचा वापर करा. रस्त्यावरूनच चालावे लागत असेल तर रस्त्याच्या उजवीकडून चाला, म्हणजे वाहने तुमच्या मागून नव्हे तर समोरून येतील.

But what are PMC and Traffic Police doing!

There are 3 major components of road safety.

  1. Engineering (safe infrastructure built by the Local Governing Body)
  2. Enforcement (of acts and rules, by Traffic Police)
  3. Education (safe use of the system, by people)

 

This campaign focuses only on the 3rd component. That does not mean the other two are less important.  We are constantly pushing PMC and Pune Traffic Police to do their job better.

रस्ता सुरक्षेचे ३ प्रमुख घटक आहेत.

  1. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे सुरक्षित पायाभूत सुविधांची उभारणी
  2. वाहतूक पोलिसांद्वारे कायदे आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी
  3. लोकांद्वारे वाहतूक व्यवस्थेचा सुरक्षित वापर

 

ही मोहीम फक्त तिसर्‍या घटकाबाबत आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे, की इतर दोन घटकांना कमी महत्त्व आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे वाहतूक पोलीस ह्यांनी त्यांचे काम अधिक चांगले करावे ह्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असतो.