Save Pune Traffic Movement

Promoting safe, sustainable and inclusive transportation

शाळा-कॉलेजेसमध्ये workshops ठरवण्यासाठी

Workshops घेणार्‍यांची उपलब्धता आणि ठरलेली workshops

तुम्हांला

  • एखाद्या शाळा/कॉलेजमध्ये workshop ठरवायचे असेल, किंवा
  • आपण workshop घेण्यासाठी कधी उपलब्ध आहोत ते नोंदवायचे असेल,

… तर हा फॉर्म भरावा.

Map of campaign area

Schools we are targetting in 2026-27

Number of schools and volunteers enrolled in the campaign

मोहीम काय आहे?

शाळेचे नाव नोंदवणे

(१) शाळांच्या कार्यालयात जाऊन मुख्याध्यापकांची वेळ मागणे

  1. शाळेच्या ऑफिसमध्ये पत्र द्यायचे. “ही मोहीम आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शाळांना सहकार्याचे आवाहन केले आहे” हे ऑफिसमध्ये आवर्जून सांगायचे.
  2. शाळेचे नाव, ठिकाण/पत्ता, फोन नंबर आपल्याकडे लिहून घ्यायचा.
  3. “हे पत्र मुख्याध्यापकांना द्यावे. त्यांना १० मिनिटे कधी भेटता येईल?” असे विचारून वेळ घ्यायची. ही वेळ लगेच मिळाली नाही तर १-२ दिवसांमध्ये फोन करून पाठपुरावा करायचा.

(२) मुख्याध्यापकांची भेट

  1. (आम्ही कोण?)
    मी Save Pune Traffic Movement ह्या NGO कडून आले/आलो आहे. आमची संस्था वाहतूकविषयक प्रश्नांवर काम करते. विशेषत: चालणं, सार्वजनिक वाहतूक आणि सायकल वापरणं सोयीचं असावं, आणि अपघाती मृत्यू कमी व्हावेत ह्यावर आमचा भर असतो.
  2. (मोहीम कशाची? वाहतूक पोलिसांचा पाठिंबा आहे!)
    पुण्यातील अपघाती मृत्यू, त्यातही पादचारी मृत्यू, कोविडनंतर खूप वाढले आहेत. त्यामुळे पादचारी मृत्यू कमी करण्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. ह्या मोहिमेला वाहतूक पोलिसांचा पाठिंबा आहे.
  3. (महत्त्वाची आकडेवारी- कृपया चक्क पाठ करावी!)
    पुण्यात कोविडपूर्वी दरवर्षी सुमारे ६०-७० पादचारी मृत्यू व्हायचे. आता हा आकडा ११०-१२० च्या घरात आहे. म्हणजे मृत्यू ७०-८०% ने वाढले आहेत!
    एकूण मृत्यूंमध्ये पादचार्‍यांचं प्रमाण ३० ते ३५% असायचं. २०२५ मध्ये पहिल्यांदाच ते ३६% झालं आहे! त्यामुळे ह्यावर तातडीने काम करायला हवं. हा आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
  4. (हो, भारतातलंच उदाहरण!)
    ही मोहीम केरळातल्या एका छोट्या शहरातल्या यशस्वी मोहिमेवर आधारित आहे. आपण जपान-युरोपची गोष्ट करत नाही आहोत – पण ज्या तंत्रामुळे केरळात पादचारी मृत्यू एका वर्षातच ५०% ने कमी होतात, ते पुण्यात जमायला काही अडचण नाही.
  5. (त्या तंत्राविषयी माहिती द्यायची.)
    रस्ता ओलांडताना हात समोर धरला तर चालकांना पादचारी लवकर दिसतात. हे अनेक ज्येष्ठ नागरिक करतात, पण सगळ्यांनीच करायला हवं.
  6. महत्त्वाचा मुद्दा असा, की आपण वाहनं थांबवायचा प्रयत्नही करत नाही आहोत. ह्या तंत्रामुळे वाहनचालकांना पादचारी लवकर दिसतात. आपण वाहन वळवताना जसा इंडिकेटर देतो, तसाच चालतानाही द्यावा.
  7. (शाळेकडून अपेक्षा)
    आम्हांला कल्पना आहे, की शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात आणि शिक्षक busy असतात. ही मोहीम सुरक्षिततेबाबत आहे, त्यामुळे आपण सहभागी व्हाल अशी आम्ही आशा करतो.
  8. आम्ही शिक्षकांचं एक workshop घेऊ, त्याला फक्त अर्धा-पाऊण तास लागेल. आणि शिक्षकांनी हे तंत्र आत्मसात करून त्यांच्या वर्गाला शिकवायचं आहे – कारण त्यांच्या शिक्षिका त्यांच्या ’देवी’ आहेत. मला वाटतं की शिक्षक, मुलं आणि त्यांचे पालक ह्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही एवढं नक्कीच कराल.
  9. अर्थातच, शाळेवर ह्याचा आर्थिक भार अजिबात नाही.
  10. (फॉर्म भरून घेणे)
    तुम्ही प्लीज हा online फॉर्म भरून शाळेचं नाव नोंदवाल? जेमतेम ५ मिनिटं लागतील, आत्ताच करून टाकू या?
    (खाली त्याचा QR Code दिला आहे, तो त्यांना दाखवायचा; किंवा आपल्या फोनवरून फॉर्म उघडायचा. ही त्या फॉर्मची लिंक.)

महाविद्यालयाचे नाव नोंदवणे

(१) महाविद्यालयाच्या कार्यालयात जाऊन प्राचार्यांची वेळ मागणे

  1. महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये पत्र द्यायचे. “ही मोहीम आपल्या शहरातील पादचारी मृत्यू कमी करण्यासाठी आहे, आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांनी महाविद्यालयांना सहकार्याचे आवाहन केले आहे” हे ऑफिसमध्ये आवर्जून सांगायचे.
  2. महाविद्यालयाचे नाव, ठिकाण/पत्ता, फोन नंबर आपल्याकडे लिहून घ्यायचा.
  3. “हे पत्र प्राचार्यांना द्यावे. त्यांना १० मिनिटे कधी भेटता येईल?” असे विचारून वेळ घ्यायची. ही वेळ लगेच मिळाली नाही तर १-२ दिवसांमध्ये फोन करून पाठपुरावा करायचा.

(२) प्राचार्यांची भेट

  1. (आम्ही कोण?)
    मी Save Pune Traffic Movement ह्या NGO कडून आले/आलो आहे. आमची संस्था वाहतूकविषयक प्रश्नांवर काम करते. विशेषत: चालणं, सार्वजनिक वाहतूक आणि सायकल वापरणं सोयीचं असावं, आणि अपघाती मृत्यू कमी व्हावेत ह्यावर आमचा भर असतो.
  2. (मोहीम कशाची? वाहतूक पोलिसांचा पाठिंबा आहे!)
    पुण्यातील अपघाती मृत्यू, त्यातही पादचारी मृत्यू, कोविडनंतर खूप वाढले आहेत. त्यामुळे पादचारी मृत्यू कमी करण्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. ह्या मोहिमेला वाहतूक पोलिसांचा पाठिंबा आहे.
  3. (महत्त्वाची आकडेवारी- कृपया चक्क पाठ करावी!)
    पुण्यात कोविडपूर्वी दरवर्षी सुमारे ६०-७० पादचारी मृत्यू व्हायचे. आता हा आकडा ११०-१२० च्या घरात आहे. म्हणजे मृत्यू ७०-८०% ने वाढले आहेत!
    एकूण मृत्यूंमध्ये पादचार्‍यांचं प्रमाण ३० ते ३५% असायचं. २०२५ मध्ये पहिल्यांदाच ते ३६% झालं आहे! त्यामुळे ह्यावर तातडीने काम करायला हवं. हा आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
  4. (हो, भारतातलंच उदाहरण!)
    ही मोहीम केरळातल्या एका छोट्या शहरातल्या यशस्वी मोहिमेवर आधारित आहे. आपण जपान-युरोपची गोष्ट करत नाही आहोत – पण ज्या तंत्रामुळे केरळात पादचारी मृत्यू एका वर्षातच ५०% ने कमी होतात, ते पुण्यात जमायला काही अडचण नाही.
  5. (त्या तंत्राविषयी माहिती द्यायची.)
    रस्ता ओलांडताना हात समोर धरला तर चालकांना पादचारी लवकर दिसतात. हे अनेक ज्येष्ठ नागरिक करतात, पण सगळ्यांनीच करायला हवं.
  6. महत्त्वाचा मुद्दा असा, की आपण वाहनं थांबवायचा प्रयत्नही करत नाही आहोत. ह्या तंत्रामुळे वाहनचालकांना पादचारी लवकर दिसतात. आपण वाहन वळवताना जसा इंडिकेटर देतो, तसाच चालतानाही द्यावा.
  7. (पहिला टप्पा)
    ही मोहीम पुण्यात काही टप्प्यांमध्ये राबवावी लागेल. त्यातला पहिला टप्पा आम्ही ६० शाळांपासून सुरू करतो आहोत. त्यामध्ये हे तंत्र आम्ही शिक्षकांना शिकवू आणि शिक्षक मुलांना शिकवतील. त्याला सर्व शाळांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
  8. (महाविद्यालयाकडून अपेक्षा)
    शिक्षकांनी मुलांना हे तंत्र शिकवलं, की मुलांना त्याचं प्रात्यक्षिकही घडायला हवं. त्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांची मदत हवी आहे. NEP / NSS / NCC अंतर्गत हे काम सहज होऊ शकेल.
  9. (किती मुलं, किती तास?)
    साधारण १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान तुमची किती मुलं २० दिवस (४ आठवडे * ५ दिवस) रोज एक तास उपलब्ध होऊ शकतील? २० दिवस सलग कठीण असल्यास दर दिवसाआड? (२ गट करू, प्रत्येक गट दर दिवसाआड.)
    प्रत्येक विद्यार्थ्याचे २० तास भरतील.
  10. (फॉर्म भरून घेणे)
    संकल्पना आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा online फॉर्म भरून तुमच्या महाविद्यालयाचं नाव नोंदवाल? जेमतेम ५ मिनिटं लागतील, आत्ताच करून टाकू या?
    ह्यातील तपशिलामध्ये थोडेफार बदल आपण नंतर करू शकतो.
    (खाली त्याचा QR Code दिला आहे, तो त्यांना दाखवायचा; किंवा आपल्या फोनवरून फॉर्म उघडायचा. ही त्या फॉर्मची लिंक.)